राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल चे समर कॅम्प चे उद्घाटन डॉ रामप्रसाद शेळके यांच्या हस्ते पार पडले !

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल चे समर कॅम्प चे उद्घाटन,डॉ रामप्रसाद शेळके यांच्या हस्ते पार पडले !
देऊळगाव राजा : (मातृतीर्थ छावा न्यूज) दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल ने ५ ते १२ वयोगट तसेच १२ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी चे समर कॅम्प चे उद्घाटन डॉ.रामप्रसाद शेळके यांच्या हस्ते पार पडले. आज राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल ने ५ ते १२ वयोगट तसेच १२ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी चे समर कॅम्प आयोजन केले होते, समर कॅम्पला पालक वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळताना आज उद्घाटन प्रसंगी दिसला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोगातून,विद्यार्थांच्या कलागुणांचा दर्जेदार विकास निश्चितच होईल.समर कॅम्प मध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक आरोग्य या वयात सुदृढ होणार, या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांची काळजी घेतल्या जाईल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्वांगीण वाढीबाबत निश्चितच फायदा होईल असा विश्वास संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.रामप्रसाद शेळके यांनी व्यक्त केला.
उन्हाळी शिबिरा मध्ये वयानुसार गटाचे वर्गीकरण करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करणे सहज शक्य होणार आणि त्यांच्यात असलेल्या गुणवत्तेवर भर दिला जाणार. संस्था विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेणार आणि जे उपक्रम आयोजित केले आहे ते परिपूर्ण विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अट्टाहास संस्थेचा राहील.समर कॅम्प मधील उपक्रम,कला आणि हस्तकला,रेखाचित्र आणि चित्रकला,मजेदार खेळ,योग आणि ध्यान,श्लोक,कराटे,संगीत आणि नृत्य,गायन यापैकी आज संगीत, कला, मजेदार खेळ, हस्तकला यावर शिक्षकांनी प्राथमिक स्वरूपाचे धडे उत्कृष्ट पद्धतीने आज दिले आहे.
राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबद्दल सदैव कटिबद्ध असून, परिसरात एकमेव सीबीएससी च्या माध्यमातून उत्कृष्ट शिक्षण देणारी संस्था आणि त्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे शिक्षण या संस्थेतून दिले जात आहे.या शाळेत कलेच शिक्षण,कलागुण, विद्यार्थामधील कलागुणांचा शोध, आत्मसंरक्षण,विद्यार्थांच्या गुणवत्तेत वाढ,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, दर्जेदार शिक्षकांच्या माध्यमातून कार्य निरंतर संस्था करत आहे.
समर कॅम्प चे आयोजन विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांसाठी कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था करत आहे आणि निरंतर करत राहणार.
पालकांनी आपल्या पाल्यासासाठी भाग घेतला आहे त्यांना निश्चितच या उपक्रमांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेत वाढ होईल आणि मानसिक आरोग्याबरोबर सर्वांगीण विकास देखील होणारच असे मत संस्थेच्या वतीने डॉ.रामप्रसाद शेळके यांनी व्यक्त केले आहे. त्या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे सी. ई. ओ. सुजित गुप्ता, प्राचार्या डॉ. प्रियंका देशमुख व उपप्राचार्य फैसल ओस्मानी,सौ संत मॅडम, आर्ट & क्राफ्ट चे शिक्षक शदानंद झिंजे, हार्मोनियम & गायण शिक्षक झीने, कराटे आणि स्केटिंग चे शिक्षक राजू खांडेभराड,श्लोक,योगा आणि डान्स शिक्षीका सौ पल्लवी संत मॅडम यांच्यासह आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.संस्थेतील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम रंगतदार करण्यात मोलाचे सहकार्य लाभले आहे.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सि ई ओ.श्रीमान.सुजित गुप्ता यांनी पार पाडले.