सिंदखेडराजा दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुर्लक्ष का? दोघांच्या संगनमताने होत आहे का काम निर्माण होतो प्रश्न? दस्तलेखक यांच्याकडून दस्त नोंदणीसाठी सामान्य जनतेची दिवसाढवळ्या लूट होत आहे ती थांबविण्याची सक्त गरज आहे त्यासाठी याला रोखण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना मैदानात उतरणार आहे.
सिंदखेडराजा (मातृतीर्थ छावा न्यूज) : सिंदखेडराजा येथे दस्तलेखक यांच्याकडून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची होणारी लूट थांबवण्याबाबत दिनांक २५/०४/२०२५ रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.खरेदी विक्री व्यवहारामध्ये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असून सामान्य जनतेची यामध्ये लूट होत आहे त्याला आळा घालण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा जनहिताच्या मुद्यावर मैदानात उतरणार आहे असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
निवेदनात प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे,
१) सिंदखेड राजा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत दस्त नोंदणी साठी अतिरिक्त रक्कम दस्तलेखकाकडून आकारली जाऊ नये.
२) दुय्यम निबंधक कार्यालयात शेतकरी व खरेदी विक्री करणाऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून शासनाचे दरपत्रक दुय्यम निबंधक कार्यालयासह दस्तलेख करणाऱ्या कार्यालयात लावण्यात यावे.
३) दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकृत कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कार्यालयीन कामकाजासाठी इतर कोणताही अनाधिकृत व्यक्ती दिसू नये.
४) खरेदीखतासाठी नियमानुसार लागणाऱ्या शुल्का बाबत नागरिकांनी विचारणा केली असता शासकीय दर पत्रकानुसार शुल्क सांगण्यात यावे.
५) नियमानुसार खरेदी होत नसेल तर त्याचे कारण स्पष्ट लेखी स्वरूपात देण्यात यावे,तोंडी कारण देऊन नये.
६) दस्त लेखन करणाऱ्यांकडून नागरिकांना चुकीची माहिती दिली गेल्यास त्यांच्यावर कारवाई व्हावी.
७) तुकडे बंदीच्या आदेशाचे उल्लंघन न करता खरेदी विक्री व्यवहाराचे दस्त योग्यरित्या तपासले जावे,गुंठेवारी खरेदीखत होत असतांना तुकडे बंदी कायद्याचे उल्लंगन होऊ नये म्हणून याची दक्षात घेण्यात यावी.
८) खरेदीसाठी लागणारे शुल्क नियमाप्रमाने घेण्यात यावे, दास्त्लेखन करणारे लागलेल्या शुल्काव्यतिरिक्त दुप्पट रक्कम नागरिकांकडून घेत असेल तर त्यावर लगाम लावण्यात यावा.
९) सिंदखेड राजा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दलालांचा अटकाव करण्यात यावा.
१०) खरेदी-विक्री करण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला सन्मानाची वागणूक मिळावी त्याचप्रमाणे तासनतास बसण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी.
११) ऍडव्होकेट ॲक्टनुसार दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी विक्रीचे व इतर सर्व व्यवहार करण्यात यावे.
१२) दुय्यम निबंधक कार्यालय दलालामार्फत व्यवहार होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी.
१३) दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी यांनी खरेदी विक्रीचे सर्व कागदपत्र दलालामार्फत पाठवू नये.
१४) तहसील कार्यालयातील सर्व विभाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणात आणले जावे. अनधिकृत पणे स्वयंघोषित कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत.
१५) महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 2017 नुसार, मुद्रांक शुल्क न आकारणाऱ्या दास्तलेख लिहिणाऱ्यावर कारवाई करावी.
१६) मृत्युपत्र, खरेदीखत, अभिहस्तांतरण, खरेदीखत, करारनामा, भाडेपट्टा, गहाणखत, अदलाबदल पत्र, बक्षीसपत्र, वाटपपत्र असे विविध प्रकारचे दस्त नोंदणीसाठी अतिरिक्तशुल्क लावणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.
१७) मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, दस्त हाताळणी फी बाबत नागरिकांना याची माहिती विचारले असता माहिती योग्यरित्य देण्यात यावी तसेच माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून त्याची व्यवस्था करावी.
१८) दस्त सादर केल्यावर टोकन रजिस्टरमध्ये नोंद करून टोकन देण्यात यावे.
१९) दुय्यम निबंधकाद्वारे दस्ताची पडताळणी झाल्यावर कागदपत्र किंवा दस्तातील चुका आढळल्यास त्या चुका योग्य असल्यास सेवाहमी नियम ६ नुसार पोच मागणी केल्यास पोच देण्यात यावी.जर दुय्यम निबंधक यांनी दस्ताची नोंदणी नाकारावयाची असेल, तर त्यांनी नोंदणी अधिनियम, 1908 कलम 71 नुसार दस्त नोंदणी नाकारण्याची कारणे नमूद करून लेखी आदेश पारित करून आदेशातील कारणे नोंदणी पुस्तक क्रमांक 2 मध्ये नमूद करावे.तसेच दस्त नोंदणीस नाकारला’ अशा आशयाचे पृष्ठांकन/शेरा दस्तावर नमूद करून दस्त संबंधित पक्षकारास परत करणे आणि पुस्तक क्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या नोंदीच्या प्रती विनाशुल्क व विनाविलंब देण्यात याव्या.
२०) एका दिवसात दस्त नोंदणी करणे हे सेवा हमी कायद्याने बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंगन होऊ नये.
२१) निबंध कार्यालयामध्ये मागील एका वर्षापासून झालेल्या सर्व दस्तांची चौकशी करावी तसेच यामध्ये बेकाशी दस्त नोंदणी झाली असल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२२) दस्त नोंदणी साठी दस्त जमा केला असता नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ५२, महाराष्ट्र नोंदणी नियम १९६० चे नियम ३९ तसेच कलम ३२ चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
२३) दस्त नोंदणीस नकार दिला गेल्यास,कलम ७१ नुसार कार्यवाही करण्यास नागरिकांनी आग्रह धरल्यास कार्यवाही व्हावी.दस्त नोंदणीस नकार देताना कलम ७१चे पालन करण्यात यावे.
२४) नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ५२, महाराष्ट्र नोंदणी नियम १९६० चे नियम ३९ चे आणि कलम ३२ चे पालन करण्यात यावे.
२६) दास्तलेख करणाऱ्यांना कार्यालयासाठी कायदेशीर कोणत्या नियमांतर्गत तहसील कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे याचा लेखी खुलासा करण्यात यावा.
वरील प्रमाणे जनहिताच्या प्रमुख मागण्या असून त्यावर संबधित कार्यालय कोणती कार्यवाही करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
वरील मागणीबाबत संबंधित विभागाकडून १५ दिवसात लेखी स्वरूपात उत्तराची अपेक्षा संघटनेने ठेवली आहे. जर निर्धारित केलेल्या वेळेत उत्तर मिळाले नाही तर लोकशाही मार्गाने अखिल भारतीय छावा संघटना जिल्हाभर आंदोलन उभारले. असेदेखील छावा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
निवेदन देता प्रसंगी अ.भा.छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव,अ.भा.छावा संघटना बुलढाणा प्रसिद्धी प्रमुख रफीक सैय्यद,अ.भा.छावा संघटना सिंदखेड राजा विधानसभा प्रमुख बाळासाहेब शेळके पाटील यांची उपस्थिती होती.