संत चोखामेळा धरणातील अवैध रेती उपसा बंद करा युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांची होती मागणी.अधिकाऱ्यांच्या ठोस लेखी आश्वासनानंतर संतोष भुतेकर यांचे जलसमाधी निर्णय मागे.

संत चोखामेळा धरणातील अवैध रेती उपसा बंद करा युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांची होती मागणी.अधिकाऱ्यांच्या ठोस लेखी आश्वासनानंतर संतोष भुतेकर यांचे जलसमाधी निर्णय मागे.

अधिकाऱ्यांच्या ठोस लेखी आश्वासनानंतर संतोष भुतेकर यांचे जलसमाधी निर्णय मागे.संत चोखामेळा धरणातील अवैध रेती उपसा बंद करा युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांची होती मागणी.

  • संत चोखामेळा धरणात रेती उपसा करणाऱ्या बोटींच्या तेलगळतीने मासे मरत आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, अवैध रेती उत्खनन बंद करण्याबाबत युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी दिला होता जलसमाधी घेण्याचा इशारा.

देऊळगावराजा (मातृतीर्थ छावा न्यूज) – बुलढाणा जिल्ह्यातील संत चोखामेळा धरणातील अवैधरतीचे उत्खनन होत आहे त्याला रोखण्यास प्रशासन असफल होत असल्याचे दिसत आहे.प्रशासनाने ठोस पावले उचलावी अन्यथा युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.जलसमाधी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत मध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी घडत असलेला प्रकार विषद केला, आज मासे मरत आहे उद्या माणसे मरतील असा गंभीर प्रश्न उपस्थित केला.सध्या अवैध रेती उपशासाठी धरणात बोटी वापरल्या जातात त्यावर परप्रांतीय मजुर काम करत आहे, कोठेही नोंद नसलेले कामगारामुळे खडकपूर्णा प्रकल्पाचे अस्तित्व धोक्यात आहे.

कोणत्याही परिस्थितीत रेती उपसा करणाऱ्याचा मुळासकट नायनाट झालाच पाहिजेत.संतोष भुतेकर यांनी केलेल्या मागणीची अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेऊन बैठकीत घेतली.पावणे दोन तास चाललेल्या या बैठकीत सर्व विषयावर सविस्तर चर्चा होऊन,कायदेशीर नीती कशी अमलात आणाता येईल त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित जबाबदार असणाऱ्या विभागांच्या उपस्थित सर्व अधिकाऱ्यांसमोर चर्चा करून सर्वांना वेळ न दवडता आपली आपली जबाबदारी पार पाडून रेती माफियांचे रॅकेट उध्वस्त

कसे करता येईल त्या पद्धतीचे निर्देश दिले त्यामध्ये प्रामुख्याने खडकपूर्णा प्रकल्प ज्यांच्या ताब्यात आहे ते पाठ बंधारे विभागाचे अधिकारी यांना सुद्धा उपविभागीय अधिकारी यांनी धारेवर धरले आपण तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी व पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित रेती चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे. पोलीस सुद्धा याचा गांभीर्यपूर्वक शोध घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली.वन विभागाने सुद्धा आपल्या आपल्या हद्दीतील रस्ते तात्काळ खोदून टाकायचे व ज्यांनी रस्ते केले त्यांच्यावर वन विभागाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, ज्या गावांमधून रेती उत्खनन होते त्या गावातील सरपंच पोलीस पाटील सुद्धा याला जबाबदार असल्यामुळे त्यांना सुद्धा आपल्या मोहिमेत सामील करून घ्यावे. सरपंचाने देखील सहकार्य करावे आणि जे पोलीस पाटील सहकार्य करणार नाही त्यांना आम्ही निलंबित करू असा इशाराही उपविभागीय अधिकारी यांनी दिला.

आंदोलन कर्त्यांना त्यांच्या मागणीनुसार दैनंदिन पथक हे गस्तीवर राहणारच असून ज्या पथकांच्या उपस्थित रेतीचे वाहने जातील त्या पथकांवर सुद्धा कारवाई होईल.सध्या धरणातील मासे मरत आहेत धरणाच्या पाण्यावर तेलाचा तरंग आला आहे ही बाब गंभीर असून यामध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाही कारण अनेक गावांना धरणातून पाणीपुरवठा होत आहे,त्यामध्ये बऱ्याच गावांना फिल्टर सुद्धा नाही,शिवाय रेतीमाफीया यांची वाढती मग्रुरी लक्षात घेता यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्रास होतच आहे परंतु यामध्ये प्रशासनाची सुद्धा प्रतिमा मलीन होत असून यापुढे आपण आता हे सहन करणार नसल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले.

संतोष भुतेकर यांच्यावर आता आंदोलनाची वेळ येणार नाही त्यांनी सहकार्य करावं पुन्हा आठ दिवसातच आपण आढावा बैठक घेऊन सातत्याने रॅकेट उध्वस्त करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला.चर्चा झाल्यानंतर भुतेकर यांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले बैठकीमध्ये महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,वन विभाग,पाटबंधारे विभाग, परिवहन विभाग, सिनगाव चे माजी सरपंच प्रकाश गीते यांच्यासह अनेक नागरिक व पत्रकार बांधव सदर बैठकीमध्ये उपस्थित होती.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *