समर कॅम्प ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद!

समर कॅम्प ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद!
देऊळगावराजा (मातृतीर्थ छावा न्यूज) – राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल ने आयोजित केलेल्या समर कॅम्प ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद असा पालक व विद्यार्थी वर्गांचा मिळाला आहे. समर कॅम्प चे राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांच्या दृढ निश्चयाने संस्थेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संस्थेतील आयोजित केलेल्या समर कॅप मध्ये होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी देखील मनसोक्त संगीत,आर्ट, क्राफ्ट, गायन, योग ,श्लोक, स्केटिंग यामध्ये भाग घेतला आणि भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची स्वतःमधील गुणवत्ता सिद्ध करण्याबाबत सफलतेचे सूत्र,शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन आणि त्यामधील शिक्षण विविध आयोजित केलेल्या उपक्रमाद्वारे देताना विद्यार्थ्यांमधील वाढत असलेला आत्मविश्वास म्हणजे आयोजित केलेले उपक्रमाचे फलित म्हणावे लागेल.
समर कॅम्प चे उद्घाटक डॉ रामप्रसाद शेळके यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत असताना विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होणार आहे. विद्यार्थ्यांमधील, आत्मविश्वास,आत्मसंरक्षण,कला, दर्जेदार शिक्षण,यासारख्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित केलेल्या विविध उपक्रमाद्वारे ज्ञानात भर निश्चितच होणार.भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात तरुण कसे सक्षम होतील आणि त्यांच्यात असलेल्या गुणवत्तेवर भर देऊन त्यांचा सर्वांगीण विकास जास्त प्रमाणात कसा होईल यावर संस्था भर देऊन एक उचित कार्य करणार आहे.येणाऱ्या काळात या संस्थेतील विद्यार्थी देशासाठी विधायक कार्यात मोलाचे योगदान निभावणार आहे यात शंका नाही असे मत संस्थापक अध्यक्ष डॉ रामप्रसाद शेळके यांनी व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले शाळेचे सी.ई.ओ सुजित गुप्ता, प्राचार्य डॉ. प्रियंका देशमुख, उपप्राचार्य फैसल ओस्मानी.आर्ट & क्राफ्ट चे शिक्षक सदानंद झिंजे, हार्मोनियम & गायण शिक्षक झीने, कराटे आणि स्केटिंग चे शिक्षक राजू खांडेभराड,श्लोक,योगा आणि डान्स शिक्षीका सौ पल्लवी संत मॅडम यांच्यासह आदी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम रंगतदार करण्यात मोलाचे सहकार्य लाभले आहे.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सि ई ओ.श्रीमान.सुजित गुप्ता यांनी पार पाडले.