मेंढपाळाचा पोराने रचला इतिहास,पोरगा झाला आयपीएस !

मेंढपाळाचा पोराने रचला इतिहास,पोरगा झाला आयपीएस !
-
कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी
कोल्हापूर (मातृतीर्थ छावा न्यूज) – “घरात पहिलाच पोरगा शाळा शिकला अन् मेंढ्या वळूनसन आयपीएस झाला”… हे मेंढपाळ वडिलांच्या तोंडचे वाक्य जीवनाचे सार सांगून जाते. समाजात अजूनही शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी हा बिरूदेव सिध्दाआप्पा होणे आशादायक आहे.
- २०२४ मध्ये केंदीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे येथील सिद्धाप्पा डोणे या मेंढपाळाचा मुलगा बिरदेव हा अवघ्या २७ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात ५५१ रँकने उत्तीर्ण झाला. त्यामुळे बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी बनणार आहे.
- २०२४ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) दुपारी जाहिर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थितीत जल्लोष करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे ह्या छोट्याशा गावातील बिरू देव सिद्धाप्पा होणे हा धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबातील बिरूदेव स्थापत्य विभागात पदवीपर्यंत शिक्षण घेतले.
घरी कोणीच शिकलेले नाही की कोणतीच पदवी नाही, कसलीच पार्श्वभूमी नाही पण हे किती दिवस चालणार? कधी ना कधी शिक्षणाची कास धरायला हवी. याच विचाराने बिरूदेव ने पण शिक्षणाची वाट धरली. घरातून शाळेत जाणारा, पदवीपर्यंत शिक्षण घेणारा बिरूदेव हा पहिलाच मुलगा. त्यातही मेंढ्या वळणं सुटलेले नाही.
अगदी आत्तापर्यंत… हे सारं करताना बिरूदेव देखील मेंढ्या पाळण्यासाठी त्या आधारित कामे करण्यासाठी अजूनही शेतात, रानात जावे लागत असे. हे सांभाळत बिरूदेव याने वर्ग दहावीच्या परीक्षेत 96टक्के गुण मिळून तो मूरगुह केंद्रात पहिला आला होता.पुढे मुरगुड येथील शिवराज कॉलेजमध्ये त्याने बारावी विज्ञान शाखेत 89 टक्के गुण मिळवत मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान सुद्धा पटकावला होता त्यांनी पुण्याच्या सीओइपी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. पुढील दोन वर्षे दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. त्यानंतर पुणे येथे परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला आतापर्यंत दोन वेळा परीक्षा देऊन त्याला यश आले नाही. मात्र तिसऱ्या वेळी त्याने मोठा जिद्दीने अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या या प्रचंड स्पर्धेच्या परीक्षेत देशात 551 वी रैंक पटकावत यशाला गवसणी घातली.
त्याच्या या यशाला समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.मह्या पोरगा मोठा साहेब झाला त्याचा सर्वात जास्त आनंद वडिलांना झाला.
पाचवीला पुजलेली गरिबी त्यातच मेंढपाळ हा व्यवसाय कायम भटकंतीचा नशिबात दोन घास सुद्धा सुखाने मिळत नाही. या जितरबाला सांभाळताना प्रचंड हाल आपेष्टा सहन कराव्या लागतात. परंतु आता आमच्या बिरूदेवने आमच्या कष्टाचा चीज केलं. तो आता मोठा साहेब झाला त्याचे सर्वात मोठा आनंद आहे बिरूदेव ची आई …
असे उद्गार वडिलांच्या तोंडातून निघाले…
बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदीर या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले तर इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सीओईपी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर बिरदेवने दिल्लीमध्ये आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरु ठेवले होते. याठिकाणी त्याने दिवसातून २२ तास अभ्यास करत परीक्षेची तयारी केली. दिल्लीमध्ये ने कस्ट आयएएस आणि वाझराम क्लासेस याठिकाणी परीक्षेसंबधी मार्गदर्शन घेतले परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले.
या परीक्षेचा निकाल आज समजताच यमगे येथे त्याच्या मित्रपरिवाराने एकच जल्लोष केला सध्या बिरदेव हा बेळगाव जिल्हयात मामाच्या गावी गेला आहे. बिरदेवचे वडिल सिद्धापा डोणे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यांनी परिस्थिती बेताची असतानाही मेंढपाळ व्यवसाय करीत आपला मुलगा बिरदेव याला उच्चपदस्थ अधिकारी बनविण्याच्या उद्देशाने शिक्षण दिले.
बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा चार वर्षापूर्वी भारतीय सैन्यात भरती झाला आहे त्यामुळे बिरदेवच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळू शकली. आई बाळाबाई, विवाहित बहिण, भाऊ व वडिल असे कुटूंब आहे.
-
दहावी बारावीला केंद्रात प्रथम
बिरदेव हा सुरुवातीपासूनच हुशार होता. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये मुरगूड केंद्रात सर्वप्रथम आला होता. गणित विषयात त्याला या दोन्ही परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते.
-
अशी असावी जिद्द,चिकाटी
इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेताना बिरदेवने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभागी झाला होता. पण त्यामध्ये अपयश आल्याने त्याने खचून न जाता मोबाईल टीव्ही व खेळ यापासून अलिप्त रहात जिद्दीच्या जोरावर केवळ अभ्यासाला महत्व दिले.
-
मनात एक निश्चय आयपीएस होणारच !
बिरदेव दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करत होता. महिन्याला दहा-बारा हजार रुपये त्याला खर्चासाठी पाठवणे वडिलांना कठीण होत चालले होते. त्यामुळे हा नाद सोड आणि एखादी नोकरी कर असा तगादा वडिलांनी बिरदेवकडे लावला होता. मात्र यूपीएससी परीक्षेत यशस्वी होणारच ही जिद्द बिरदेवने बोलून दाखवली होती.
-
अखंड परिश्रमाच्या बळावर यशाची पक्की खात्री.
अलीकडेच काही दिवसापूर्वी माझे ध्येय अंतिम टप्प्यात आले आहे. इंटरव्यू झाला आहे. निवड निश्चित आहे. कोणाला याबाबत लगेच सांगू नको, अशी माहिती बिरदेवने नेव्हीत असलेला आपला गावकरी मित्र यश घाटगे याला दूरध्वनी वरून दिली होती.