अखंड परिश्रमाच्या बळावर शरद उबाळेंची महसूल सहायकपदी निवड.

अखंड परिश्रमाच्या बळावर शरद उबाळेंची महसूल सहायकपदी निवड.
ध्येय निश्चित होते त्या दिशेने प्रयत्न करत अखेर विवाहाच्या तेरा वर्षांनी मिळाले यशाचे फळ!
सिंदखेडराजा (मातृतीर्थ छावा न्यूज) – दि.२५ – सिंदखेडराजा तालुक्यातील निमखेड येथील सामान्य कुटुंबातील शरद उबाळे यांनी जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या बळावर ध्येयावर लक्ष केंद्रित करून अभ्यासात सातत्य ठेवून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळविले असून महसूल सहायकपदी निवड झाली.
कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही,विवाहानंतर तेरा वर्षांनी जो विवाहपूर्वी निश्चय केला होता त्याची परिपुर्तता यश संपादन करून झाली आहे.
मिळालेल्या यशाबद्दल कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी त्यांचे कौतूक केले.
सन २०२३ ला घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल मागिल आठवड्यात लागला. या परीक्षेत निमखेड येथील शरद उत्तमराव उबाळे यांनी यश मिळविले. त्यांची ठाणे येथे अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त कार्यालयात महसूल सहायकपदावर नियुक्ती झाली आहे.
शरद उबाळे यांचा २०१२ ला विवाह झाला. त्यांनी राज्यशास्त्र विषयात एमएपर्यंत शिक्षण पूर्ण करत सेट नेट पदवी प्राप्त केली आहे. लग्नानंतर तीन वर्षे गावी राहिल्यावर अभ्यासात सातत्य ठेवले. अनेकवेळा परीक्षा देऊन अपयश आले. परंतु खचून न जाता पुन्हा मेहनतीने अभ्यास केला. अखेर यशाचा सूर्य २०२५ ला उगवला.
प्रेरणादायी कार्य करत फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन वाचन,संस्कृती वाढवणार व गावातील भावी पिढीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणार असल्याचे शरद उबाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी मिरवणूक काढून केले स्वागत.
गावकऱ्यांनी या यशाबद्दल परिसरातील नागरिकांनी वर्दडी बुद्रुक येथून फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. प्रत्येक घरासमोर औक्षण करून सत्कार केला. यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, बीडीओ अंकुश म्हस्के, उद्योजक रामदास काकडे यांनी सत्कार केला. मिरवणुकीदरम्यान पत्नी, आई, वडील, भाऊ आनंदीत झाले. त्यांना गहिवरून आले होते. सर्वांच्या आनंदाश्रू वाहत होते.