छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह सिंदखेड राजा येथे नियोजन बैठक संपन्न !
सिंदखेडराजा (मातृतीर्थ छावा न्यूज) – दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह सिंदखेडराजा येथे संपन्न झाली.
छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव १४ मे २०२५ रोजी भव्य दिव्य साजरा करायचा असून १८ पगड जातीधर्मातील बांधवांना सोबत घेऊन,हा उत्सव ऐतिहासिक साजरा कसा करता येईल हा बैठकीचा मूळ उद्देश होता. बैठकीत छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी प्रबोधानात्मक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा देखील झाली, शंभू राजे यांच्या विचारांचा गौरव, त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनाक्रमाद्वारे त्यांच्या कार्यांवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम आयोजित करण्यावर विचार विमर्श झाला आणि पुढील काही दिवसात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन करून स्पष्ठ केले जाईल.असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
या बैठकीचा मूळ उद्देश उत्कृष्ट दर्जाचा जन्मोत्सव सोहळा पार पाडणे हा मुख्य हेतू असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचे मत मतांतरे मांडण्यासाठी बैठक घेणे अगत्याचे होते,म्हणून बैठकीची आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीला अखिल भारतीय छावा संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव, कार्याध्यक्ष कृष्णा कोल्हे, जिल्हा संघटक निलेश देवरे, प्रसिद्धीप्रमुख रफीक सैय्यद, विधानसभा प्रमुख बाळासाहेब शेळके पाटील, सोशल मीडिया प्रमुख नारायण मस्के आदी पदाधिकाऱ्यांसह जिजाऊ भक्त, शिव शंभू भक्त उपस्थित होते.