मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत राष्ट्रीय सत्संग मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो सेवेकरी येण्याचा अनुमान.

मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत राष्ट्रीय सत्संग मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो सेवेकरी येण्याचा अनुमान.

मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत राष्ट्रीय सत्संग मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो सेवेकरी येण्याचा अनुमान.

सिंदखेडराजा (मातृतीर्थ छावा न्यूज) – मातृतीर्थ ऐतिहासिक नगरीमध्ये ‘जागर स्त्री शक्तीचा आणि गजर राष्ट्रभक्तीचा’ हा राष्ट्रीय महासत्संग मेळावा,महिला सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे मोलाचे जीवन उपयोगी तत्त्वज्ञानाची शिदोरी शब्दरूपी प्रसादाच्या माध्यमातून मिळणार आहे.

विशेष करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तबगार ५१ महिलांचा सत्कार या मेळाव्यात करण्यात येणार असून,बेरोजगार, वधू-वर परिचय,कृषी या सारखे विविध उपक्रम मेळाव्यात राबविण्यात येणार आहेत.

ऐतिहासिक मेळाव्यात महाराष्ट्रातील राज घराण्यातील वंशज तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत राहिलेले सेनापती, वंशजांचा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक २० मे रोजी सकाळी ८ वाजता गुरुचरित्र पारायण, २ ते ३ वाजेपर्यंत दुर्गा संप्तशती पारायण, संध्याकाळी ५.३० वाजता मुख्य कार्यक्रमात अखिल भारतीय स्वामी समर्थ परिवाराचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे सकल मानवजातीला ज्ञानाची शिदोरी दिली जाणार आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमाची जय्यत तयारी सबंध महाराष्ट्रभर सुरू आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देश आणि महाराष्ट्रातून १० लाखापेक्षा जास्त स्वामी सेवेकरी, जिजाऊ भक्त, शिवभक्त, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही,त्यादृष्टीने सिंदखेड राजा बरोबर इतरही जिह्यात नियोजन करण्यात येत आहे.

सिंदखेडराजा येथे दिनांक २० मे २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय सत्संग मेळाव्यासाठी सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी केंद्रबिंदू असणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांतदादा मोरे, आबासाहेब मोरे व नितीन मोरे नियोजन बैठका राज्यभर मेळाव्याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून घेणे सुरू केले आहे.

नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, संभाजीनगर, जालना, नाशिक, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर यासह महाराष्ट्रातील ४८ जिल्ह्यातील प्रत्येक शहरात तसेच ग्रामीण भागात हजारो सेवेकरी ‘चलो सिंदखेडराजा, चलो सिंदखेडराजा’ अशा प्रकारचे बॅनर, कट आऊट, पोम्प्लेट, प्रचार व प्रसाराचे काम जोरदार सुरू आहे. तसेच परराज्यातून गुजरात, दिल्ली गोवा व अन्य राज्यातून सुद्धा स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. जागतिक विश्वशांती हा उदांत हेतू समोर ठेवून राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

  • २० टक्के अध्यात्म व ८० टक्के समाजसेवा हा उद्देश समोर ठेवून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी केंद्रातील अनेक मंत्री, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती उपस्थिती राहणार आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *