कर्जाचे बँकेचे नोटीस आले म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली, सरकार शेतकऱ्याप्रती संवेदनशील नाही?

कर्जाचे बँकेचे नोटीस आले म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली, सरकार शेतकऱ्याप्रती संवेदनशील नाही?
नांदेड (मातृतीर्थ छावा न्यूज) जि- नांदेड ता – धर्मबाद – पाटोदा येथील हरिदास बोंबले यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी सर्वत्र कळताच अगदी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आणि त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घडत असलेल्या आत्महत्येच्या घटना दुःख देऊन जात आहे.
महायुती सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी सत्तेत येण्यासाठी शेतकरी कर्जमाफी, हमीभाव ही आश्वासन दिली होती पण ती पूर्ण न झाल्याने महाराष्ट्रात सरकार स्थापनेपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या एकापाठोपाठ सुरूच आहे याची गांभीर्य सरकार घेताना दिसत नाही,शेतकरी हरिदास बोंबले यांना टोकाचं पाऊल उचलावे लागले केवळ कर्जामुळे, कर्जाची रक्कम कशी फेडावी म्हणून शेतकरी स्वतःचे जीवन संपवत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सहकारी पक्ष अजुन किती लोकांचे जीव घेणार आहे? शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी नाही, पीक विमा नाही, हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याने जगायचं कसं. या गोष्टीला राज्याचे सरकार जबाबदार आहे… आता तरी शेतकऱ्यांनी जागा व्हायला पाहिजे…
कर्जमाफी द्या.. तरच शेतकरी आत्महत्या थांबतील. महायुती सरकारने जो जगाचा पोशिंदा आहे त्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, येणारा काळ याचा नक्कीच हिशोब घेणार आहे … निसर्ग नियम कोणालाच माफ करत नाही