भाजपच्या तालुका अध्यक्षांची निवड : घनसावंगी विधानसभेत भाजपला मिळाले नवे नेतृत्व; पुरुषोत्तम उढाण यांना घनसावंगी, तर अंबड तालुक्याची जबाबदारी शिवाजी मोरें कडे

घनसावंगी: भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वअतंर्गत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी विधानसभेतील मंडळांना नवे नेतृत्व लाभले आहे. घनसावंगी, शहागड (अंबड) आणि रांजणी (जालना ग्रामीण-2) या तालुक्यांसाठी नव्या अध्यक्षांची निवड घनसावंगी येथे रविवारी करण्यात आली. घनसावंगी तालुका अध्यक्षपदी पुरुषोत्तम उढाण, शहागड (अंबड) तालुका अध्यक्षपदी शिवाजी नाना मोरे, तर रांजणी (जालना ग्रामीण-2) तालुका अध्यक्षपदी श्री. संजय आटोळे यांची निवड करण्यात आली.
1 जानेवारी 2025 पासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे ‘संघठण पर्व’ अर्थात नवीन सदस्यता अभियान सुरु केले होते. त्या अंतर्गत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे विक्रंमी 1.50 कोटी प्राथमिक सदस्य तर 1 लाख 34 हजार सक्रिय सदस्य पुर्ण झाले. भारतीय जनता पार्टीने कामाच्या सोयीनुसार घनसावंगी विधानसभेत 3 मंडळाची निर्मिती केली. या तिन्ही मंडळातून मंडळ अध्यक्ष पदासाठी प्रत्येक मंडळातून इच्छुकांची चाचपणी करुन जिल्हयातील नेतृत्वाच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष यांच्या सोबत चर्चा करुन घनसावंगीच्या मंडळ अध्यक्ष पदाची घोषणा रविवारी पक्षाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत केली. घनसावंगी तालुका अध्यक्षपदी पुरुषोत्तम उढाण, शहागड (अंबड) तालुका अध्यक्षपदी शिवाजी नाना मोरे, तर रांजणी (जालना ग्रामीण-2) तालुका अध्यक्षपदी संजय आटोळे यांची निवड करण्यात आली. या नूतन अध्यक्षांचे भाजपा जिल्हा प्रमुख बद्रीनाथ पठाडे, जिल्हा सरचिटणीस सिद्धीविनायक मुळे आणि सभापती श्री. अवधूत नाना खडके व भाजपा नेते सतीश घाटगे यांनी नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले.
पक्षश्रेष्ठींनी नव्या नेतृत्वाला संधी दिल्याबद्दल सतीश घाटगे यांनी उपस्थित नेत्यांचे आभार मानले. या निवडीमुळे पक्षाला अधिक उंचीवर नेण्यास मदत होईल, तसेच नव्या नेतृत्वाच्या साथीने घनसावंगी विधानसभेत विकास आणि प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडी प्रसंगी ज्येष्ठ नेते बाबुराव खरात, माजी तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे, महिला संघटक अर्चनाताई सोसे, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदर्गे, माजी सभापती नामदेव ढाकणे, माजी जि.प. सदस्य जीवनराव वगरे, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रमेश तारगे, ज्येष्ठ नेते अनिरुद्ध झिंजुर्डे, भगवान बर्वे, रामेश्वर माने, अरुण घुगे,चंद्रकांत बांगर, पांडुरंग खटके, ज्ञानेश्वर डोईफोडे, केदार राठी, पंकज रक्ताटे, विलास होंडे, प्रेमानंद उढाण आदी मान्यवर उपस्थित होते.