डॉ.रामप्रसाद शेळके यांच्याकडून देउळगावराजा शहरामध्ये प्रथमच अभिनव उपक्रमाचे होत आहे कौतुक !
देऊळगावराजा : देऊळगावराजा शहरात प्रथमच अभिनव उपक्रमाची सुरुवात.या उपक्रमाद्वारे गायकांना प्रोत्साहन देऊन,कलागुणांना वाव मिळवून देण्यासानी डॉ.रामप्रसाद शेळके यांनी राजलक्ष्मी कराओके सिंगिंग & म्युझिक क्लब ची स्थापना केली.
प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध कला गुण दडलेले असतात, त्या दडलेल्या गुणांना एक सुंदर व्यासपीठ मिळावे म्हणून डॉ.शेळके यांच्या संकल्पनेतील मुक्त छंद वावरण्यासाठी मोकळ्या वातावरणात मनसोक्त जीवन जगण्यासाठी, गायनातून दैनंदिन जीवनातील तणाव कमी होऊन,एक अप्रतिम आनंद जीवनात या उपक्रमातून प्रत्येक व्यक्तीला मिळत आहे. प्रत्येकाच्या जीवनात आनंद द्विगुणित होणारच, गायनाने आणि संगीताने त्यांना समाधान लाभून आयुष्य नक्कीच प्रफुल्लित करणारा हा उपक्रम ठरणार आहे.
देऊळगाव राजा शहरातील नागरिकांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी परिसरात प्रत्येकांना एक प्लॅटफॉर्म मिळवुन दिला,जेणेकरून त्यांच्यातील उत्कृष्ठ गुण समोर येतील आणि त्यांना गायनाची व संगीताची संधी मिळेल हा आशावादी दृष्टिकोन जपत उपक्रमाची सुरुवात झाली.या उपक्रमाबद्दल सामाजातील सर्व स्तरातून डॉ. शेळके यांचे कौतुक होत आहे.तसेच त्यांनी राजलक्ष्मी समर कॅम्प च्या माध्यमातून लहान मुलांना दररोज तीन तास योगा,संगीत,आर्ट क्राफ्ट, श्लोक यातून उत्कृष्ठ दर्जाचे धडे दर्जेदार शिक्षकांच्या माध्यमातून दिले.डॉ रामप्रसाद शेळके यांच्यातील दूरदृष्टीकोण जो आहे त्याचे पालक वर्गाकडून कौतुक होत आहे. सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलची सवय जडली आहे त्याला रोखण्यास या उपक्रमातून फारच मदत झाली आहे असे पालकांकडून सांगण्यात आले आहे.आयोजित केलेल्या उपक्रमात सुजित गुप्ता,प्रमोद जैस्वाल,मेघराज देशपांडे,कविता खरात मॅडम,अमोल सुरळीकर, सुधीर हिवाळे,निरज पारीख,वणवे,राहूल म्हस्के,साळुंखे (मुंबई अँक्टर),सचिन सोळंकी,आहिरे,नितीन मेहेत्रे,नरोडे,धिरडे यांच्यासह अनेक नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे.
येणाऱ्या काळात नक्कीच आपण यासारखे मानवाच्या दृष्टीने हिताचे उपक्रम आपण हाती घेणार आहोत असे मत डॉ. रामप्रसाद शेळके यांनी व्यक्त केले आहे.