उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण…

  • ठाणे : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे येथील पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे गुरुवार, दि ०१ मे, २०२५ रोजी सकाळी ८ वाजता प्रमुख शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व विविध उपक्रम पार पडले.

या समारंभात जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागाच्या मोबाईल मेडिकल युनिटने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल मेडिकल युनिटच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय, आरोग्य सेवा सशक्त करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या तीन नव्या रुग्णवाहिकांचे उद्घाटनही करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा, प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी, प्राथमिक आरोग्य केंद्र धसई या प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा देखील येथे सन्मान करण्यात आला. ‘NQAS certified PHC’ च्या वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचा सत्कार देखील करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस.स्वामी,यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Rafik Latif Saiyyad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *