चरणसिंग राजपूत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नांदुरा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
नांदुरा (मातृतीर्थ छावा न्यूज) – गेल्या अनेक वर्षा पासून शेतकऱ्यांनसाठी अनेक आंदोलने उपोषण निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधून शेतकरी हिताचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम चरणसिंग यांनी केले आहे,हे लक्षात घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खासदार राजु शेट्टी साहेब यांच्या आदेशाने व जिल्हा अध्यक्ष अमोल दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चरणसिंग राजपूत यांची नांदुरा तालुका अध्यक्ष पदी म्हणून एका पत्राद्वारे नियुक्ति करण्यात आलेली आहे. त्यांनी गेल्या आठ वर्षा पासून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून अनेक आंदोलन उपोषण निवेदन या माध्यमातून सरकार व प्रशासन यांना धारेवर धरले व शेतकऱ्यांना न्यावं मिळवा म्हणून जिल्हाधिकारी, तहसीलदार,कृषिअधिकारी,पीकविमा कंपनी अधिकारी यांना अनेक वेळा निवेदने दिले व शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून उपोषण देखील केले आहे त्याच बरोबर शेतकरी हितासाठी अनेक आंदोलने देखील केले. नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरात फुल नाही तर फुलाची पाखळी तरी आली पाहिजे अशी भावना मनात ठरवुन अनेक वेळा उपोषण केले या आधी देखील युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस म्हणून त्यांनी तीन वर्ष कमान संभाळली होती. तर नंतर स्वतः राजीनामा देऊन भारतातील सर्वात मोठे हिंदू संघटन श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या नांदुरा तालुका उपाध्यक्ष पदावर देखील काम केले आहे, याचीच दखल म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा.खासदार राजू शेट्टी साहेबांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष अमोल दादा पाटील यांनी चरणसिंग राजपूत यांची नांदुरा तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.
नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर चरणसिंग राजपूत यांनी देखील सांगितले की हा माझ्यावर ठेवलेला विश्वास खूप मोठा आहे तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सोबत घेऊन नांदुरा तालुक्यात संघटना मजबूत करू असे देखील चरणसिंग राजपूत यांनी नियुक्ती झाल्या नंतर म्हटले आहे.
शेतकऱ्यांसाठी कितीही गुन्हे अंगावर दाखल झाले तरीही ते आम्ही घ्यायला तयार आहोत,शेतकऱ्यांनी खचून न जाता सरकार विरोधात लढावं आणि आपला जो हक्क आहे तो घेण्यासाठी तीव्र आंदोलन करावं,शेतकरी संघटना कायम शेतकऱ्यांन सोबत आहे आता रडायचं नाही तर लढायचं अस देखील चरणसिंग राजपूत यांनी म्हटले आहे.