केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेला अशोक राजे जाधव यांनी दिली धावती भेट!

केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेला अशोक राजे जाधव यांनी दिली धावती भेट!
सिंदखेडराजा : दिनांक 26 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य अन्नासाहेब जावळे पाटील यांच्या जयंती निमित्त बुलढाणा जिल्ह्यातून लातूर येथे जात असताना अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव व त्यांचे सहकारी कृष्णा कोल्हे, रफीक सैय्यद,संतोष राजे जाधव बाळासाहेब शेळके पाटील या पदाधिकाऱ्यांसह स्वामी विवेकानंद विद्यामंदिर केज शाळेला धावती भेट दिली असता,शाळेच्या वतीने अशोक राजे जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक मुळे मॅडम,सहशिक्षक नेहरकर,गायकवाड,शेंडगे,समुद्रे,आदमाने यांच्यासह आदी शिक्षकांच्या वतीने शाल श्रीफळ देऊ करण्यात आला, त्या प्रसंगी शाळेचे प्रोग्रेस बुक (कर्मयोगी) देऊन अशोक राजे जाधव यांचा सन्मान देखील केला. नंतर शाळेची शैक्षणिक क्षेतातील प्रगती,शाळेत राबवले जाणारे उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित कसे केले जाते, शिक्षक विद्यार्थ्यांवर विकासाच्या बाबतीत कसे काम करतात,शाळेचा स्वच्छ परिसर, शाळेतील वाचनालय यांसारख्या विविध विषयावर सखोल चर्चा झाली.
शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यात गुणवत्तेत अग्रेसर असलेली शाळा म्हणून नावलौकिक मिळविला आहे संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत या शाळेने शास्त्रज्ञ, कित्येक डॉक्टर्स, इंजिनीअर्स, शासकीय सेवेतील विविध पदांवरील अधिकारी, राज्यपातळीवरील खेळाडू घडवले आहेत.
शालेय पातळीवर होणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेचे विद्यार्थि तालुक्यात प्रथम असतात असे संस्थेचा वतीने चर्चेदरम्यान सांगण्यात आले.
अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह संस्थेच्या वतीने केलेला माझा सन्मान माझ्या सदैव स्मरणात राहील आणि मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत आपले सदैव स्वागत राहील पुढे देखील अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा जिल्ह्यात ज्या ठिकाणी मदत लागेल, तेथे आम्ही देण्यास तत्पर राहू असे मत अशोक राजे जाधव यांनी व्यत केले आहे.त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षकांचे आभार देखील मानले.
अभिनंदन