केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने घवघवीत मिळविले यश.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ( UPSC 2024) अंतिम निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याची अदिबा अनम अश्फाक अहमद ने संपूर्ण भारतातून 142 वी रँक प्राप्त केली आहे. यापूर्वी आदिबाने यूपीएससी ची मुलाखत दिली होती, परंतु अंतिम निवड झाली नव्हती. पण या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाली आहे. तिला IAS पोस्ट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनली आहे.
आदिबा ही हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि नंतर जामीया निवासी प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती.
तिच्या या यशामुळे अनेक विद्यार्थिनींना प्रेरणा मिळेल. तिच्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
यवतमाळ (मातृतीर्थ छावा न्यूज) – केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने घवघवीत यश मिळविले आहे. शहरातील कळंब चौक परिसरातील ऑटो चालकाची मुलगी अदिबा अनम अशफाक अहमद या विद्यार्थिनीने संपूर्ण भारतातून १४२ वी रँक प्राप्त केली आहे.
यवतमाळ येथील अबिदा अनम अश्फाक अहमद हिला संपूर्ण भारतातून १४२ वी रँक मिळाली आहे. ती यवतमाळ येथे कळंब चौकात मोठे वडील मुस्ताक अहमद यांच्याकडे राहते, हालाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी स्वत:चे मालकीचे घर सुद्धा घेता आले नाही. ती शायर अश्फाक शाद यांची मुलगी आहे. ते भाड्याने ऑटो चालवितात.
अदिबाचे प्राथमिक शिक्षण जफरनगर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील जिल्हा परिषद एक्स गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधून झाले. अकरावी-बारावी विज्ञान शाखेत जिल्हा परिषद एक्स गव्हर्नमेंट ज्युनिअर कॉलेज यवतमाळ येथून पूर्ण केले. बी. एससी. गणित या विषयात आबदा इनामदार सिनिअर कॉलेज पुणे येथून पूर्ण केले. त्यानंतर युनिक अकॅडेमी पुणे येथून यूपीएससीचे फाउंडेशन कोचिंग घेतले. त्यानंतर पहिला प्रयत्न मुंबई हज हाउस आयएस प्रशिक्षण संस्थेमधून केला, दुसरा हमदर्द स्टडी सर्कलमधून, तसेच तिसरा व चौथा प्रयत्न जामीया मिलिया इस्लामिया प्रशिक्षण संस्था न्यू दिल्ली येथून केला. चौथ्या प्रयत्नात तिला यश मिळाले आणि स्वप्न पूर्ण झाले असे अदिबाने सांगितले.
हालाकीची परिस्थिती असूनही देखील अखंड परिश्रमाच्या जोरावर यश संपादन केलं जाऊ शकत. या सामान्य कुटुंबातील मुलीच्या यशावरून स्पष्ट होतं.
आदिबा सांगते…
‘मला डॉक्टर व्हायचे होते, पण…’ परंतु, आमची परिस्थिती सामान्य,सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने शक्य झाले नाही. त्यामुळे मी खचले होते. परंतु, यवतमाळ येथील सेवा एनजीओ या संस्थेचे सेक्रेटरी निजामुद्दीन शेख यांनी प्रेरणा दिली. त्यांनी आयएएस करून समाजाची, देशाची सेवा कशी करता येऊ शकते याबद्दल माहिती दिली. त्यांनी प्रोत्साहित केले आणि मी यूपीएससी करण्याचा निर्धार केला. माझ्या यशाची माहिती जेव्हा माझ्या आईवडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.