मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्य बैठकीचे आयोजन.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्य बैठकीचे आयोजन.
सिंदखेडराजा (मातृतीर्थ छावा न्यूज) – दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वा शासकीय विश्रामगृह सिंदखेडराजा येथे १४ मे २०२५ रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या माध्यमातून १८ पगड जातीधर्मातील बांधवांना सोबत घेऊन जयंती उत्सव साजरी करण्याचा बैठकीचा मूळ उद्देश आहे.या बैठकीत छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव, त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना आणि कार्यांवर चर्चा करून उत्कृष्ट दर्जाचा जन्मोत्सव सोहळा पार कसा पाडता येईल याबाबत प्रत्येकाचे मत मांडण्यासाठी बैठक घेणे अगत्याचे आहे म्हणून बैठकीची आयोजन करण्यात आले आहे.
तरी अखिल भारतीय छावा संघटनेचे बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच जिजाऊ भक्त, शिव शंभू भक्त यांच्यासह,या महापुरुषांच्या विचारवर कार्य करणाऱ्या विविध संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन छावा संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव यांनी केले आहे.