सिंदखेडराजा तहसीलदारांचे बैठे पथकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ? कारवाई का नाही जनतेच्या मनात संभ्रम ?

सिंदखेडराजा तहसीलदारांचे बैठे पथकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ? कारवाई का नाही जनतेच्या मनात संभ्रम ?

सिंदखेडराजा तहसीलदारांचे बैठे पथकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ? कारवाई का नाही जनतेच्या मनात संभ्रम ?

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा महसूल विभागाचे दुर्लक्ष का?
खुलेआम रेती करणारे तहसीलदार यांच्या पेक्षा वरचड ठरत आहे याकडे
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी खुलेआम होणारी वाळूतस्करीं रोखण्या बाबत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे असा जनतेत आवाज उठत आहे.

सिंदखेडराजा तालुक्यात हिवरखेडपूर्णा, निमगाव वायाळ व दुसरबीड येथे अवैध रेती उत्खननाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना, तहसीलदार अजित दिवटे यांनी ११ ते १७ एप्रिलदरम्यान ‘विशेष बैठे पथक’ नियुक्त केले. मात्र, हे पथक केवळ कागदोपत्री असून, प्रत्यक्षात ठोस कारवाई का होत नाही कारवाई ऐवजी मॅनेजमेंट पथक आहे का असा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे बोलले जात आहे. या बैठे पथकातून आर्थिक वसुली करण्याचे माध्यम ठरत असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.या बैठे पथकाच्या नियुक्तीनंतरही खुलेआम वाळूतस्करी सुरू असल्याचा दावा नागरिकांकडून तसेच इतर प्रसारमाध्यमांकडून पुराव्यानिशी झाल्याने नियुक्त केलेल्या पथकाचा कर्तव्यात कसूर असल्याचा ठपका जनतेद्वारे ठेवण्यात आला आहे. तहसीलदार स्वतः सुट्टीवर गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत हे पथक केवळ नावापुरतं काम करत असल्याचं बोललं जात आहे. या पथकाच्या उपस्थितीतच हिवरखेड पूर्णा व दुसरबीड परिसरात सर्रास अवैध रेती वाहतूक होत आहे.
एका प्रसार माध्यमाने यासंदर्भात हजारो ब्रास रेती उत्खननाचे व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर तहसीलदार दिवटे यांनी माध्यमांशी बोलून कारवाईचे आश्वासन दिले, पण चार दिवस उलटून गेले तरीही पथकाने कारवाई केली नाही,दोषी कर्मचाऱ्यांवर कुठलीही शिस्तभंगाची कारवाई झाली. यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर सामान्य जनतेत संशय व्यक्त होत आहे.

दि. १४ एप्रिलच्या रात्रीदेखील पथकाच्या डोळ्यांदेखत अवैध रेती वाहतूक सुरू होती. हे लक्षात घेता, आता प्रशासकीय यंत्रणेतील कर्तव्यदक्ष वरिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी या पथकातील निष्क्रीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील का? असा प्रश्न तालुक्यातील जनता करीत आहे. तहसील स्तरावर कारवाईला सुरुंग लावणारेच जर संरक्षण द्यायला लागले, तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? सध्या संपूर्ण तालुक्यात हाच प्रश्न गंभीरपणे विचारला जात आहे.

तालुक्यातील नागरिकांनी महसूल विभागाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे व जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडून ठोस कारवाईची अपेक्षा
केली जात असून, जर वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतील, तर नागरिकांच्या मनात प्रशासनाविषयीचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘विशेष बैठे पथका’ची निष्क्रियता आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. वरिष्ठ प्रशासनाने तात्काळ कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर पावले उचलली नाहीत, तर हा असंतोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Rafik Latif Saiyyad

कार्यकारी संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *