राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी.

देऊळगाव राजा : देऊळगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मोलाची कामगिरी करत,विविध उपक्रमांद्वारे राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल जनमानसात वेगळीच प्रतिमा निर्माण करणारी सध्यातरी देऊळगाव राजा परिसरात एकमेव संस्था ठरत आहे.

दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली.राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल च्या अध्यक्षा डॉ. मिनलताई शेळके व सचिव डॉ.रामप्रसाद शेळके यांनी जयंती निमित्त विद्यार्थांना महात्मा फुले यांचे देशासाठीचे मोलाचे योगदान काय आहे, त्या काळातील शैक्षणिक परिस्थितीचे वर्णन करत, त्या काळी शिक्षणावर कसा भर दिला गेला आणि आता का दयावा. त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याला मार्गदर्शनाद्वारे डॉ रामप्रसाद शेळके यांनी उजाळा दिला.

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मधील असंख्य विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये सहभाग नोंदवून,महात्मा फुले यांच्या कार्याविषयी विविध पैलूंना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्र‌माला शाळेचे सी. ई. ओ. सुजित गुप्ता, प्राचार्या डॉ. प्रियंका देशमुख व उपप्राचार्य फैसल ओस्मानी यांनी जयंती चे औचित्य साधुन एन. एस. ओ या परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणप्रत्र देऊन सत्कार करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रम प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *