देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल चे प्री-स्कूल साठी समर कॅम्प चे आयोजन.

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत,विद्यार्थांच्या कलागुणांचा दर्जेदार विकास कसा होईल या हेतूने शारीरिक, मानसिक आरोग्य विद्यार्थ्यांचे या वयात सुदृढ कसे राहील याची खास करून या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांची काळजी घेतल्या जाणार असल्याबाबत संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.रामप्रसाद शेळके सातत्याने प्रयत्न करताना दिसत असतात. त्यामुळे
समर कॅम्प चे आयोजन दिनांक २१ एप्रिल २०२५ ते ५ मे २०२५ पर्यंत राहणार असून वेळ दुपारी ४:०० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत असणार आहे, समर कॅम्प साठी प्रत्येक विद्यार्थांसाठी फक्त ९००/- रु शुल्क आकारण्यात आला असून,उन्हाळी शिबिरा मध्ये वयानुसार गटाचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
गट क्रमांक १ मध्ये ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थी, आणि गट क्रमांक २ मध्ये १२ वर्षापेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी या प्रकारचे वर्गीकरण करून हा
उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. त्यात
१) कला आणि हस्तकला
२) रेखाचित्र आणि चित्रकला
३) मजेदार खेळ
४) योग आणि ध्यान
५) श्लोक
६) कराटे
७) संगीत आणि नृत्य
८) गायन
यासारख्या कलेच शिक्षण आणि विविध विषयातून कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थामधील कलागुणांचा शोध घेऊन,त्या दिशेने प्रयत्न करत विद्यार्थांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी,
नियोजनबध्द विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल म्हणून दर्जेदार शिक्षक या संस्थेत कार्य करतांना दिसत आहे. आजच्या युगात आत्मसंरक्षण देखील दैनंदिन जीवनात फार महत्वाचा भाग असल्यामुळे,त्यावर देखील या संस्थेद्वारे विद्यार्थांसाठी आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे कार्य या ठिकाणी केले जात आहे.
समर कॅम्प चे आयोजन केवळ विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांसाठी याद्वारे कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. सर्व पालकांनी आपल्या पाल्यासाठी निश्चितच या उपक्रमांमध्ये भाग घ्यावा,जेणेकरून त्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल आणि मानसिक आरोग्य मजबूत होईल असे मत संस्थेच्या वतीने डॉ.रामप्रसाद शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा
संस्थेत आपले स्वागत आहे. समर कॅम्प मध्ये भाग घेणे आणि माहिती नोंदणीसाठी संपर्क क्रमांक Mo-9545555477, 9730433013, 9730615564, 7823841380