अ भा छावा संघटनेच्या वतीने देऊळगावराजा येथे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती साजरी.

अ भा छावा संघटनेच्या वतीने देऊळगावराजा येथे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती साजरी.
देऊळगावराजा : आज दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक देऊळगावराजा येथे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती अखिल भारतीय छावा संघटना देऊळगाव राजा तालुक्याच्या वतीने साजरी करण्यात आली असून,अण्णासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात संघटनेला जोमाने बळ देऊ आणि जनसामान्यांच्या प्रश्नावर प्रखरतेने काम करण्याचा निर्धार उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी केला. जयंतीनिमित्त अ भा छावा संघटनेचे देऊळगाव राजा सोशल मीडिया प्रमुख नारायण म्हस्के, शहराध्यक्ष राजू पंडित, शहर उपाध्यक्ष विशाल सोनवणे, विकास कव्हळे,भागवत तोरमल, विठ्ठल देशमुख, सिद्धार्थ मुख्यदल, पंडितराव कोल्हे, सोनाजी तिडके दीपक राजे, संजय मल्लावत यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.