अखिल भारतीय छावा संघटनेचे जनहिताच्या विविध मागण्यासाठी देऊळगाव राजा नगर पालिकेला निवेदन

अखिल भारतीय छावा संघटनेचे जनहिताच्या विविध मागण्यासाठी देऊळगाव राजा नगर पालिकेला निवेदन;त्र्यंबक नगर मधील पाण्याचा पंप,रस्ता,विजेचा पोल याकडे लक्ष द्या ! अन्यथा जन आंदोलन उभारू…
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा शहरात विविध समस्येबाबत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आले, निवेदनात नमूद मागण्या,त्र्यंबक नगर मधील रस्त्याच्या मध्ये विजेचा पोल असून त्यामुळे नागरिकांना जाण्यायेण्यासाठी व्यत्यय येत आहे.तसेच राधाबाई म्हस्के यांच्या घरासमोर देखील लोखंडी विजेचा पोल आहे त्या पोलद्वारे सौम्य प्रमाणात विद्युत प्रवाह जाणवत आहे, येणाऱ्या काळात लोखंडी पोल असल्याने मनुष्य हानी होऊ शकते त्यामुळे त्या विद्युत पोलला काढण्यात यावे आणि रस्त्याच्या सुक्षित ठिकाणी उभा करावा.त्याचप्रमाणे देऊळगाव शहरात त्रंबक नगर मध्ये सध्या पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित होत आहे तो निवारण्यासाठी बऱ्याच वर्षापासून जीर्ण अवस्थेत बंद असलेला पाण्याचा पंप काढून नवीन टाकण्या यावा.तसेच त्र्यंबक नगर मधील पाण्याच्या पाईपलाइन साठी खोदल्या गेलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना जाण्यायेण्यासाठी त्रास होत आहे त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.या प्रकारच्या जनहिताच्या मुद्यावर संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्या,जेणेकरून भविष्यातील होणारे नुकसान होणार नाही,नागरिकांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास अखिल भारतीय छावा संघटना जनहितासाठी आंदोलन उभारेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या आशयाचे निवेदन नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक जाधव यांना अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या सह कृष्णा कोल्हे जिल्हा कार्याध्यक्ष अ भा छावा संघटना बुलढाणा, संतोष राजे जाधव कार्याध्यक्ष, राजू पंडित शहराध्यक्ष देऊळगाव राजा,यांच्या स्वाक्षरी सह नगर पालिका देऊळगाव राजा येथे रफीक सैय्यद प्रसिद्धीप्रमुख अ भा छावा संघटना,बाळासाहेब शेळके विधानसभा अध्यक्ष अ भा छावा संघटना मातृतीर्थ सिंदखेड राजा,नारायण मस्के सोशल मीडिया प्रमुख अ भा छावा संघटना देऊळगाव राजा,सोनाजी तिडके,गोटू काबूकडे,कैलास लोखंडे पवन कांबळे,शुभम उगले आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित राहून निवेदन देण्यात आले.