मातृतीर्थ छावा

अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली, या बैठकीत विविध पदांची नियुक्त्या जाहीर..

अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली, या बैठकीत जाहीर केल्या विविध पदांच्या नियुक्त्या.

सोलापूर (मातृतीर्थ छावा न्यूज) दिनांक २६ एप्रिल – अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार भैया घाडगे पाटील यांच्या आदेशाने,प्रदेशाध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष राजकन्या जावळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महिला आघाडी पदी गीतांजली कदम, पंढरपूर शहराध्यक्षपदी रतन टिंगरे, ज्योती विश्वकर्मा पंढरपूर तालुकाध्यक्षपदी, पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी आशिया तांबोळी, शर्मिला तांबोळी पंढरपूर तालुका संघटक पदी, रंजना अकोला यांची पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी,निवड करण्यात आली यावेळी मराठवाडा अध्यक्ष राजकन्या जावळे पाटील यांनी महिलांना संघटनेविषयी मार्गदर्शन केले आणि संघटनेत चांगल्या दर्जाची कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version