पहलगाममधे पर्यटकांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला.या भ्याड हल्ल्यानंतर PM मोदींनी घेतला सर्वात मोठा निर्णय !

पहलगाममधे पर्यटकांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला.या भ्याड हल्ल्यानंतर PM मोदींनी घेतला सर्वात मोठा निर्णय !

पहलगाममधे पर्यटकांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला.या भ्याड हल्ल्यानंतर PM मोदींनी घेतला सर्वात मोठा निर्णय !

काश्मीर – दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.30 च्या श्रीनगर पासून  सुमारे 100 किलोमीटर अंतरावर पर्यटकावर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास श्रीनगरपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात लष्करी गणवेशात आलेल्या 2-3 दहशतवाद्यांनी क्रूरपणे पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांचा बळी दहशतवाद्यांनी घेतला आहे.

प्रत्यक्षदर्शी काही लोक सांगतात की, हल्लेखोर अंदाधुंद  गोळीबार करत होते.या अमानुष हल्ल्यानंतर देशभरातून सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही तातडीने श्रीनगरमध्ये उपस्थित होऊन घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडण्याचा तातडीने निर्णय घेतला. पंतप्रधान सौदी अरेबियात दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते, परंतु त्यांनी लगेच सोमवारी रात्रीच देशात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सौदी सरकारने आयोजित केलेल्या रात्रीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं.

पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी मायदेशी परतल्यावर तातडीने कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेणार आहेत. यामध्ये तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख (Army, Navy, Air Force Chiefs) आणि वरिष्ठ सुरक्षा सल्लागार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशातील सुरक्षेची सध्याची स्थिती आणि संभाव्य कारवाई यावर उच्चस्तरीय चर्चा होणार आहे.

या घटनेवर अमेरिकेने देखील प्रतिक्रिया देत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे,’काश्मीरमधील घटना अत्यंत धक्कादायक आहे.दहशतवादाविरुद्ध अमेरिकेचा भारताला पूर्ण पाठिंबा असेल,आम्ही मृतांच्या आत्म्यास शांती आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो.’

दहशतवाद्यांच्या या कपटी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, केंद्र सरकारक कडून कठोर पावले उचलली जाणार अशी शक्यता आहे.

भ्याड हल्ल्याचा देशात सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दहशतवादी यांच्यावर केंद्र सरकारने तातडीने निर्णायक भूमिका घ्यावी असा आवाज जनतेतून समोर येत आहे.

Admin

One thought on “पहलगाममधे पर्यटकांवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला.या भ्याड हल्ल्यानंतर PM मोदींनी घेतला सर्वात मोठा निर्णय !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *