मातृतीर्थ छावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार ; युवा नेते निलेश देवरे यांचा अखिल भारतीय छावा संघटनेत प्रवेश.

अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,त्या प्रसंगी बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांनी मनसेचे युवा नेते निलेश देवरे यांना जिल्हा संघटक बुलढाणा, राजू पंडित यांना शहराध्यक्ष देऊळगाव राजा आणि विशाल सोनवणे यांना शहर उपाध्यक्ष देऊळगाव राजा म्हणून,जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या पत्राद्वारे, नियुक्तीपत्र देऊन असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षांनी त्यांचा सत्कार केला.त्या प्रसंगी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव,
गोविंदराव टेके पाटील,संतोष राजे जाधव, कृष्णा कोल्हे, रफीक सैय्यद, निलेश देवरे,बाळासाहेब शेळके पाटील, नारायण मस्के, राजू पंडित,रामेश्वर काकडे, अर्जुन राजे जाधव,निलेश देशमुख, संजय उगले, नितीन उगले, अजिंक्य शेळके यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version