मातृतीर्थ छावा

डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला विचार खऱ्या अर्थाने कृतीत उतरवण्याची गरज : प्रवीण गीते

दुसरबीड : डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला विचार खऱ्या अर्थाने कृतीत उतरवण्याची गरज निर्माण झाली आहे.नुसते बाबासाहेबांचे नाव घेऊन किंवा त्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन पूर्ण होणार नाही असे विचार प्रवीण गीते यांनी दुसरबीड येथील ज्ञानाचा सागर,विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलतांना मांडले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करून डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला विचार खऱ्या अर्थाने कृतीत उतरवण्याची गरज निर्माण झाली आहे.नुसते बाबासाहेबांचे नाव घेऊन किंवा त्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन पूर्ण होणार नाही,तर त्यांना अभिप्रेत असलेला विचार आम्हाला अंगी आणावा लागेल.
डॉ बाबासाहेबांनी लिहीलेल्या ग्रंथाबरोबरच इतरही ग्रंथसंपदा आम्हाला वाचावी लागेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञानाच दालन आमच्यात सामावलं जाईल. पुस्तक माणसाची मस्तक घडवत असतात, आणि जे लोक पुस्तक वाचतात त्यांची मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नसतात. हा शाश्वत विचार आम्हाला स्वीकारावा लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक विद्यापीठामध्ये जाऊन अभ्यास केला.आज त्यांच्या नावानेच विद्यापीठ झाले आहे.पण आजची पिढी त्या विद्यापीठात जाऊन शिकण्याऐवजी नव्याने आलेल्या व्हाट्सअप,फेसबुक युनिव्हर्सिटीत आपला वेळ खर्ची घालत आहे.त्यामुळे या भंपक युनिव्हर्सिटीच्या नादी न लागता बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला अनुयायी आपल्याला व्हायचं असेल तर अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी तरुणांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.असे आव्हान उपस्थित युवा वर्गाला प्रवीण गीते यांनी या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केले आहे.

Exit mobile version